PAN Card deactivation/ पॅन कार्ड निष्क्रियकरण, प्राप्तिकर कायदा, 1961 नुसार, सर्व पॅन कार्ड धारकांसाठी, जे सूट/ वर्ज श्रेणीमध्ये येत नाहीत, त्यांनी 31.3.2023, ३१ मार्च २०२३ पूर्वी त्यांचे पॅन कार्ड आधार कार्डशी जोडणे अनिवार्य आहे./ PAN कार्ड to AADHAR कार्ड Link करणे.
1.04.2023, १ एप्रिल २०२३ पासून, आधार कार्ड/ Aadhar Card शी न जोडलेले पॅन कार्ड निष्क्रिय/Deactivate होईल,” असा इशारा आयकर विभागाने दिला आहे. २५ डिसेंबर २०२२ ला एक परिपत्रक जारी करून प्राप्तिकर विभागाने नागरिकांना हि सुचना दिली.
प्राप्तिकर कायदा, १९६१ अनुसार सर्व पॅन कार्ड धारकांनी ३१ मार्च २०२३ पर्यंत स्वताचे पॅन कार्ड आधार कार्डसोबत जोडणे अनिवार्य आहे. अन्यथा १ एप्रिल २०२३ पासुन आधार कार्डसोबत न जोडलेले पॅन कार्ड निष्क्रिय होईल.
भारतीय अर्थ मंत्रालयाने मे २०१७ मध्ये जारी केलेल्या अधिसुचनेनुसार, यातुन काही नागरिकांना सुट देण्यात आली आहे. आसाम, मेघालय, जम्मू आणि काश्मीर या राज्यातील नागरीक , अनिवासी भारतीय , ८० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या भारतीय नागरिक व्यक्ती अशा सर्वांना या नियमातुन सवलत देण्यात आली आहे.
पॅन कार्ड आधारशी लिंक करणे का आवश्यक आहे? Why is it necessary to link PAN card with Aadhaar?
देशातील लोकांच्या आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवण्यासाठी सरकार पॅन कार्डचा वापर करते. ते प्राप्तिकर विभागाने जारी केले आहे. हे इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे कार्य करते.
एखाद्या व्यक्तीची किंवा कंपनीची सर्व कर संबंधित माहिती एकाच पॅन नंबरमध्ये नोंदवली जाते. PAN हा डेटा साठवण्याचे काम करते. हे कोणत्याही व्यक्तीला फक्त एकदाच दिले जाते. अशा परिस्थितीत, जेव्हा ते निष्क्रिय केले जाते तेव्हा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास..If PAN card will be deactivated..
- पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास ती व्यक्ती प्राप्तिकर विवरणपत्र/ Income Tax returns भरू शकणार नाही.
- मिळणार प्राप्तिकर परतावा / Income Tax Refund प्रलंबीत असेल तर तो मिळणार नाही.
- नवीन वर्षाचे Income Tax Returns भरता येणार नाहीत. त्यामुळे अधिक दराने कर कपात केली जाईल.
पॅन कार्ड आधारशी लिंक आहे कि नाही कुठे पहाल?? Where to check PAN card status??
पॅन कार्ड आधार कार्डशी जोडण्यापुर्वी ते सध्या स्थितीला आधार कार्डशी जोडले आहे कि नाही ते पहीले तपासले पाहिजे. त्यासाठी आपल्याला https://eportal.incometax.gov.in/ या इनकम टॅक्स डिपार्टमेंट च्या वेबसाइट वर जाऊन त्यांच्या होम पेजवर डाव्या बाजुला उपलब्ध असलेल्या (खाली दिल्याप्रमाणे ) Quick Links बॉक्स मध्ये असलेल्या Link Aadhar Status या दोन नंबर च्या link वर क्लिक करून

आपला PAN नंबर आणी AADHAR number त्यामध्ये भरायचा आहे. ( खाली दिल्याप्रमाणे )

यानंतर आपल्याला आपला PAN नंबर Aadhar कार्ड शी लिंक आहे की नाही हे सांगितले जाईल.
जर PAN CARD नंबर AADHAR CARD शी लिंक नसल्यास…
जर तुमचा PAN नंबर Aadhar कार्ड शी लिंक नाही असे सांगण्यात आल्यास तुम्हाला डाव्या बाजुच्या Quick Links बॉक्स मध्ये असलेल्या ३ नंबरच्या LINK AADHAR या लिंक वर क्लिक करुन विचारलेली सर्व माहीती या मध्ये भरायची आहे.
आपल्या मोबाईल नंबर/ ईमेल वर कोड पाठवुन दिलेली माहिती योग्य असल्याची खात्री केली जाईल आणि आपले पॅन कार्ड / PAN card AADHAR Card शी जोडले जाण्याची कृती सुरु केली जाईल आणि ते जोडले गेले आहे कि नाही किंवा काही अडचण/ Problem येत असल्यास आपल्याला Status/ सद्य स्थिती मध्ये सांगीतले जाईल.

सारांश-
मित्रांनो थोडा वेळ काढल्यास हे काम सहज होईल. हे न केल्यास पुढे दंड भरून हे करावे लागेल. घरकर्जासाठी,कींवा इतर मोठ्या रकमेच्या कर्जासाठी बँका मागील ३ वर्षांचे ITR ( इनकम टॅक्स रिटर्न ) भरल्याचे कागदपत्र मागतात. तुमचे पण कार्ड जर निष्क्रिय झाले तर तुम्ही ITR ( इनकम टॅक्स रिटर्न ) भरु शकणार नाही आणि तुम्हाला बँकेकडुन कर्ज नाकारले जाईल.
आशा करतो हि माहिती तुम्हाला फायद्याची ठरेल. जय हिंद, जय महाराष्ट्र!!