आरोग्य विमा/health insurance म्हणजे काय? Best health insurance plan 2024?

आरोग्य विमा/health insurance हा एक प्रकारचा विमा आहे जो आजारपणामुळे किंवा दुखापतीमुळे होणाऱ्या वैद्यकीय खर्चापासून आर्थिक संरक्षण प्रदान करतो. आरोग्यसेवेच्या वाढत्या खर्चामुळे, आरोग्य विमा असणे प्रत्येकासाठी आवश्यक झाले आहे.

Table of Contents

आरोग्य विमा योजना वैद्यकीय उपचारांचा खर्च, हॉस्पिटलायझेशन आणि इतर संबंधित खर्चांसाठी तयार केल्या आहेत. या लेखात, आम्ही आरोग्य विमा म्हणजे काय आणि सर्वोत्तम योजना कशी निवडावी यावर चर्चा करू.

आरोग्य विमा कसे कार्य करतो? How health insurance works?

आरोग्य विमा हा व्यक्ती आणि विमा कंपनी यांच्यातील करार आहे. व्यक्ती विमा कंपनीला प्रीमियम भरतो आणि त्या बदल्यात, विमा कंपनी पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तींनुसार व्यक्तीला भविष्यात येणारा वैद्यकीय खर्च भरण्यास सहमती दर्शवते.

आरोग्य विमा कसा निवडावा? How to choose best health insurance plan in india 2024?

भारतातील सर्वोत्तम आरोग्य विमा पॉलिसी निवडण्यासाठी महत्वाच्या टिप खालीलप्रमाणे.

योग्य कव्हरेज निवडा:-Choose for the Right Coverage of your health insurance plan:-

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी/health insurance policy खरेदी करताना प्लॅन अंतर्गत ऑफर केलेले कव्हरेज तपासणे महत्त्वाचे आहे. कव्हरेज म्हणजे वैद्यकीय खर्च अर्थ जो तुमच्या पॉलिसी अंतर्गत कव्हर केले जातील जसे की हॉस्पिटलायझेशन खर्च (24-तासांसाठी हॉस्पिटल मधे ऍडमिट झाल्यावर होणारा खर्च), रुग्णवाहिका शुल्क, डे केअर ट्रीटमेंट खर्च/Day care Expenses, प्रसूती खर्च इ.

डे-केअर ट्रीटमेंट म्हणजे वैद्यकीय प्रक्रिया ज्यांना २४-तासांपेक्षा कमी वेळ हॉस्पिटल मधे ऍडमिट होणे आवश्यक असते. अशा डे केअर/Day care उपचारांमध्ये डायलिसिस केमोथेरपी मोतीबिंदू रेडिएशन ईत्यादी येते.

तुमच्या कुटुंबाच्या आणि स्वतःच्या आरोग्यविषयक गरजांचा व्यवस्थित अभ्यास करून त्यानुसार तुम्हाला योग्य कव्हरेज देणारी पॉलीसी. तुमच्या गरजेपेक्षा जास्त कव्हरेज देणारी पॉलीसी घेऊ नका कारण त्यामुळे तुमचा प्रीमियम वाढेल. त्याऐवजी, तुम्ही तुमच्या गरजेनुसार रायडर्सची/Riders निवड करून तुमच्या गरजांनुसार पॉलीसी घेऊ शकता.

रायडर्स/Riders हे विमा पॉलिसी मध्ये अतिरिक्त फायदे आहेत जे तुम्ही तुमच्या सध्याच्या जीवन विमा पॉलिसीसह परवडणाऱ्या दरांमध्ये निवडू शकता. रायडर्स तुम्हाला विमा पॉलिसीचे कव्हरेज वाढविण्यात मदत करतात.

फॅमिली फ्लोटर योजनांना प्राधान्य द्या./ Buy Family Floater health insurance Policy:-

तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी विमा खरेदी करत असल्यास, प्रत्येक सदस्यासाठी वैयक्तिक आरोग्य योजना खरेदी करण्याऐवजी फॅमिली फ्लोटर पॉलीसी घ्या.

फॅमिली फ्लोटर पॉलीसी अधिक परवडणाऱ्या आहेत. तसेच घरातील प्रत्येकजण एकाच वेळी आजारी पडत नाही त्यामुळे फॅमिली फ्लोटर पॉलीसी मधे उपलब्ध विम्याची रक्कम कुटुंबातील कोणत्याही सदस्यास आवश्यकतेनुसार वापरली जाऊ शकते.

विम्याची योग्य रक्कम ठरवा:-Choose the Right Sum Insured Amount

वैद्यकीय विमा/ health insurance खरेदी करताना, तुम्ही तुम्हाला खरोखर आवश्यक असलेली विमा रक्कम निवडताय याची खात्री करा. जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त विम्याची रक्कम घेतली तर तुमचा प्रीमियम मोठ्या प्रमाणात वाढेल.

याउलट,जर तुम्ही तुमच्या गरजेपेक्षा कमी विम्याची रक्कम घेतली, तर तुमचा वैद्यकीय खर्च पूर्णपणे भरून काढण्यासाठी ती अपुरी ठरेल आणि तुम्हाला क्लेम सेटलमेंट करताना तुमच्या स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागतील.

या व्यतिरिक्त,तुम्ही हेल्थ पॉलीसी बेसिक रकमेच्या कव्हरेज सह घेऊ शकता आणि त्यावर अतिरिक्त/टॉप-अप विमा पॉलीसी खरेदी करू शकता. त्यामुळे तुमच्या विमा पॉलीसीची मुळ कव्हरेज रक्कम संपल्यास अतिरिक्त/टॉप-अप विमा पॉलीसी तुम्हाला अतिरिक्त कव्हरेज प्रदान करेल आणि तुम्हाला स्वतःला पैसे देण्याची गरज लागणार नाही.

आजीवन नूतनीकरणासह योजना निवडा:-Choose a health insurance Plan with Lifetime Renewability

आजीवन नूतनीकरणाची सुविधा असणारी आरोग्य पॉलीसी निवडण्याला प्राधान्य द्या. हे अत्यंत आवश्यक आहे कारण तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळात आरोग्य विमा पॉलिसीची आवश्यकता भासते परंतु दुर्दैवाने, तुमच्या वृद्धापकाळात आरोग्य विमा खरेदी करणे कठीण आणि महाग आहे. तुमची चालू असलेली पॉलीसी आजीवन नूतनीकरणासह येत असल्यास, तुम्ही तुमच्या वृद्धापकाळातही तीच पॉलीसी सुरू ठेवू शकता.

कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो किंवा सीएसआर(CSR) तपासा.- Check Claim Settlement Ratio.

आरोग्य विमा खरेदी करताना, विमा कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो किंवा सीएसआर(CSR) तपासा. उच्च क्लेम सेटलमेंट रेशो असलेल्या विमा कंपनीची health insurance पॉलीसी घेण्याला प्राधान्य द्या. क्लेम सेटलमेंट रेशो (CSR) म्हणजे कंपनीला प्राप्त झालेल्या एकूण दाव्यांपैकी कंपनीने यशस्वीरीत्या किती
दावे निकाली काढले यांचे गुणोत्तर आहे. कंपनीकडे 100 दावे आले पैकी 98 दावे कंपनीने निकाली काढले.म्हणजे क्लेम सेटलमेंट रेशो 98% आहे. अशाप्रकारे, उच्च सीएसआर (CSR) तुमचा दावा निकाल लागण्याची शक्यता दर्शवतो.

पॅनेल केलेल्या रुग्णालयांचे नेटवर्क तपासा:-Check the Network of Empanelled Hospitals

health insurance पॉलीसी खरेदी करताना,अशी विमा कंपनी निवडा जिच्याकडे रुग्णालयांचे नेटवर्क विस्तृत आहे. ही रुग्णालये कॅशलेस हॉस्पिटलायझेशन सेवा देतात जिथे तुम्ही 1 रुपयाही न भरता ऍडमिट होऊ शकता आणि डिस्चार्ज दरम्यान तुम्हाला हॉस्पिटलचे बिल भरण्याची आवश्यकता नसते. म्हणून, तुमच्या शेजारी असलेली हॉस्पिटल्स ज्या कंपनीच्या नेटवर्क वर आहेत अशा विमा कंपनीची पॉलीसी घ्या.

कमी पूर्व अस्तित्वातील रोग (PED) प्रतीक्षा कालावधी असलेल्या पॉलीसी घ्या.- Choose Plan with Less PED Waiting Period.

health insurance पॉलीसी निवडताना विचारात घेण्याची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्व-अस्तित्वातील रोग (Pre Existing Diseases) प्रतीक्षा कालावधी.या कालावधी मधे विमाधारक आधीच अस्तित्वात असलेल्या रोगांसाठी झालेल्या खर्चासाठी दावा करू शकत नाही.

पीईडी प्रतीक्षा कालावधी नंतर विमाधारक आधीच अस्तित्वात असलेल्या रोगांच्या उपचारासाठी झालेल्या खर्चाचा दावा करू शकतो. साधारणपणे हा प्रतीक्षा कालावधी प्रत्येक पॉलीसीनुसार 2 ते 4 वर्षांपर्यंत बदलतो.

अशा प्रकारे प्रतीक्षा कालावधी जेवढा कमी तेवढ्या लवकर तुम्ही अस्तित्वात असलेल्या रोगांच्या उपचारासाठी झालेल्या खर्चाचा दावा करू शकता.त्यामुळे कमी PED प्रतीक्षा कालावधी असलेल्या आरोग्य योजना निवडाव्यात.

आरोग्य पॉलिसींची तुलना करा:-Compare Multiple health insurance Plans.

best health insurance plan निवडण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे विविध योजनांची त्यांच्या कव्हरेज, तसेच इतर फायद्यांवर आधारित तुलना करणे. तुलनेमुळे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये सर्वोत्तम कव्हरेज तसेच इतर सुविधा देणारी पॉलिसी निवडण्यात मदत होते.आपण Online वेगवेगळ्या वेबसाइट्स च्या माध्यमातुन पॉलिसींची तुलना करु शकतो.

विमा कंपनीची बाजारातील प्रतिष्ठा तपासा:-Check Insurance Company Reputation in Market.

तुम्ही कोणत्याही आरोग्य योजना खरेदी करण्यापूर्वी त्या विमा कंपनीची बाजारातील प्रतिष्ठा तपासा. या तपासामुळे त्या विमा कंपनीने दिलेल्या विक्रीनंतरच्या विविध सेवांची कल्पना मिळू शकते. कंपनीने दिलेल्या सेवांची स्पष्ट कल्पना मिळविण्यासाठी तुम्ही विमा कंपनीची माहिती ऑनलाइन तपासू शकता.आणि त्यानंतर निर्णय घेऊ शकता.

सारांश:-Summary

आत्ताच्या काळात आरोग्यावर होणारा खर्च पाहता,आरोग्य विमा खरेदी करणे हा एक अतिशय महत्त्वाचा आणि गरजेचा निर्णय आहे.आरोग्य विमा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक संकट टाळण्यास मदत करतो.

आपण सर्वांनी covid च्या महामारीमध्ये लोकांचे झालेले आर्थिक नुकसान पहिले आहे, अनुभवलेलं आहे.घरातील एका व्यक्तीच्या आरोग्य संकटामुळे संपूर्ण कुटुंबाची आतापर्यंतची सर्व बचत संपल्याची उदाहरणे आपण बघत असतो. त्यामुळे आपणही आरोग्य विमा नक्की घ्या.

आशा करतो या लेखात दिलेली माहिती तुम्हाला योग्य आरोग्य पॉलीसी निवडण्यात मदत करेल.

जय हिंद जय महाराष्ट्र!!