IFSC code/ नंबर हा शब्द आपण सर्वांनी नक्कीच ऐकला असेल. आपल्या सर्वांना आता Online Payments, Internet banking, Gpay, Phonepay या सर्व गोष्टी अगदी सामान्य रोजच्या व्यवहारातल्या झाल्या आहेत. अगदी चहाचे पैसेपण आपण Online पे करतो.आज भारत जगभरामधे या app च्या माध्यमातुन सर्वात जास्त व्यवहार करणारा देश आहे.
पण या सर्व अँप वर पहिल्यांदा स्वतःच्या बँक अकाउंट रजिस्टर करताना बँक अकाउंट बरोबर आपल्याला IFSC नंबर/कोड विचारला जातो. हा आपल्या बँक पासबुक वर लिहिलेला असतो चेक वर लिहिलेला असतो. आणि इंटरनेट वर सर्च केला तरी मिळतो. पण हा नंबर तिथे लिहिल्याशिवाय आपली रेजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होऊ शकत नाही. काय असतो हा IFSC code/नंबर? याची गरज बँकिंग मध्ये का लागते?
what is IFSC full form? IFSC कोडचा पूर्ण अर्थ काय ?
IFSC म्हणजे Indian Financial System Code, भारतीय वित्तीय प्रणाली कोड. हा एक अद्वितीय/Unique अक्षरअंक/अल्फान्यूमेरिक कोड आहे जो भारतातील वैयक्तिक बँक शाखा ओळखण्यासाठी वापरला जातो.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), भारताची मध्यवर्ती बँकिंग संस्था NEFT (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर), RTGS (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट), IMPS (तत्काळ पेमेंट सेवा) यांसारख्या इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सिस्टममध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक बँकेच्या शाखेला IFSC कोड प्रदान करते. .
भारतातील बँका आणि त्यांच्या शाखां मधील इलेक्ट्रॉनिक मनी ट्रान्सफर सुरक्षित,कार्यक्षम आणि सुलभ करण्यासाठी IFSC कोड आवश्यक आहे. यात 11 अक्षरअंक आहेत जे बँक आणि तिच्या शाखेबद्दल विशिष्ट माहिती देतात. IFSC कोडची रचना कशी केली जाते ते आपण येथे पाहु.
IFSC कोड ची रचना कशी केली जाते? How to read IFSC Code?
- IFSC कोडचे पहिले चार वर्ण/अक्षरे बँकेचे नाव दर्शवतात. उदाहरणार्थ, “SBIN” स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रतिनिधित्व करते.
- पाचवा वर्ण नेहमी शून्य (0) असतो आणि भविष्यातील वापरासाठी राखीव असतो.
- शेवटची सहा अक्षरे बँकेची विशिष्ट शाखा दर्शवतात. हे संख्या आणि अक्षरांचे संयोजन असते.
- उदाहरणार्थ, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुंबई मुख्य शाखेचा IFSC कोड SBIN0001234 आहे. या उदाहरणात, “SBIN” बँक सूचित करते, “0” हा प्लेसहोल्डर आहे आणि “001234” शाखा ओळखतो.
IFSC कोड चा उपयोग काय? What is use of IFSC Code?
जेव्हा आपल्याला कोणत्याही अँप च्या माध्यमातुन online पैसे ट्रान्सफर सुरू करण्याआधी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना आपला अकाउंट नंबर,तसेच आपल्या बँकेचा IFSC कोड द्यावा लागतो. दुसऱ्याला जर बँक अकाउंट मध्ये पैसे online ट्रान्सफर करायचे असतील तर प्राप्तकर्त्याच्या बँक शाखेच्या IFSC कोडसह प्राप्तकर्त्याचा बँक खाते क्रमांक प्रदान करणे आवश्यक असते. IFSC कोड अचूकता सुनिश्चित करण्यात आणि व्यवहार प्रक्रियेदरम्यान कोणत्याही त्रुटी टाळण्यासाठी मदत करतो.