नमस्कार मित्रांनो !! मला आर्थिक सेवा क्षेत्राचा १० वर्ष वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे,आर्थिक सेवा क्षेत्रामधे काम करताना मला हे प्रामुख्याने जाणवले की शिक्षणाने सुशिक्षित पण आर्थिक ज्ञानाने अशिक्षिक असणारा मोठा वर्ग आपल्या महाराष्ट्रासारख्या देशात तंत्रज्ञान,अर्थ,कृषि, उत्पन्नासह अग्रेसर असणाऱ्या राज्यामधे आहे.
अजूनही टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? म्युचअल फंड म्हणजे फक्त स्टॉक मार्केट मधे गुंतवणुक, डिजिटल गोल्ड म्हणजे काय? सेवानिवृत्ती नियोजन कसे करावे? अशा अनेक सामान्य विषयांबाबत अज्ञानी असणारा मोठा वर्ग मला पहायला मिळाला आणि मिळतोय. इन्शुरन्स एजन्ट, म्युचअल फंड एजन्ट जे सांगेल त्यावर विश्वास ठेऊन गुंतवणुक केली जाते, बऱ्याच वेळेस हे एजंट नातेवाईक, मित्र असतात ज्यांना या क्षेत्रातील पुरेसे ज्ञान नसते आणि स्वतःच्या फायद्यासाठी, मिळणाऱ्या कंमीशन साठी चुकीचे मार्गदर्शन केले जाते आणि अयोग्य प्रकारे, अयोग्य पर्यायांमध्ये गुंतवणुक केली जाते आणि नंतर पश्चाताप करत बसावं लागतं.
हा ब्लॉग सर्वसामान्यांमध्ये आर्थिक ज्ञानाची भर घालण्याचा एक प्रयत्न आहे. आशा करतो तुम्हा सर्वांना ह्यातुन तुमच्या फायद्याची माहीती मिळेल. जय हिंद !! जय महाराष्ट्र !!!
Email- paisabajarcontact@gmail.com