3 Post Office Schemes-Get good Guaranteed Returns/ करा या ३ पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणुक दरमहा होईल चांगले उत्पन्न

Post Office Saving Schemes च्या माध्यमातुन भारतीय डाक विभाग ( पोस्ट ऑफिस) आपल्या गुंतवणुकदारांसाठी वेगवेगळ्या योजना घेऊन येत असते. पोस्टऑफिस चे संचलन भारत सरकार द्वारे केले जात असल्याने पोस्ट ऑफिस च्या सर्व योजना हमीच्या परताव्या सह (फिक्स रिटर्न्स) असतात. या पैंकी बहुतांश योजनांना Income Tax Act 80C/ कलम 80C अंतर्गत कर-सवलत आहे, म्हणजे तुमची एका आर्थिक वर्षातली या योजनांमधील रु.१,५०,०००/- पर्यंत ची गुंतवणुक करमुक्त आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात बरेच चढ-उतार होत असल्याचे आपण सर्व पाहत आहोत. अशा परिस्थितीत,अनेकांना धोकादायक इक्विटी मार्केटमध्ये( Equity Market) गुंतवणूक करणे आवडत नाही. अशा लोकांसाठी पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग्ज स्कीममध्ये (Post Office Small Saving Schemes-POSS) गुंतवणूक केल्याने दीर्घ मुदतीत जास्त परतावा मिळण्यास मदत होते.

या लेखात मी तुम्‍हाला टपाल कार्यालयाच्या 3 सामान्य लोकांसाठी व एक वरिष्ठांसाठी असलेल्या गुंतवणुक योजनांबाबत सांगणार आहे, ज्या हमखास परतावा देतात. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना(POMIS), पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खाते (POTD),आणि पोस्ट ऑफिस -राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) या 3 योजना आहेत व 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वरिष्ठ नागरीकांसाठी असलेलीं ज्येष्ठ नागरिक बचत योजना(Senior Citizens Savings Scheme) या गुंतवणुक योजनांबाबत आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत.

पोस्ट ऑफिस बचत योजना- व्याजदर,कालावधी,कर कपात/
Post Office Small Saving Schemes. Interest Rate/Tenure/Tax benefits.

पोस्ट ऑफिस बचत योजना
Post Office Small Saving Schemes
 व्याजदर / Interest Rate01.01.2024पासुन लागुकालावधीगुंतवणुकीवर कर कपातीचा फायदा
( Under 80C)
मिळणाऱ्या व्याजावर कर
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना/
Post Office Monthly Income Scheme
7.4%5 YearsNo/नाही Yes/हो
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (5 वर्ष)/
Post Office Time Deposit (5 year)
7.5%5 YearsYes/होYes/हो
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र/National Savings Certificate7.7%5 YearsYes/होNo/नाही
ज्येष्ठ नागरिक बचत योजना/Senior Citizens Savings Scheme8.2%5 YearsYes/होYes/हो

या पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये पैसे गुंतवण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्हाला येथे हमी परतावा मिळेल आणि या योजनांमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित आहे. प्रत्येक योजनेची माहिती तपशीलवार घेऊ.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना/
Post Office Monthly Income Scheme (POMIS)

ही पोस्ट ऑफीस ची ऊपयुक्त अशी योजना आहे जी गुंतवणूकदाराने केलेल्या एकरकमी गुंतवणुकीवर निश्चित मासिक उत्पन्नाची (guaranteed fixed monthly income) हमी देते.

कोणतीही भारतीय व्यक्ती मासिक उत्पन्न योजनेमधे (MIS) स्वतःच्या नावाने किंवा स्वतःच्या संबंधीत व्यक्ती बरोबर (जॉइंट होल्डिंग) या योजनेचे खाते उघडू शकते. अल्पवयीन व्यक्तीही या योजनेत गुंतवणूक करू शकते. जर अल्पवयीन व्यक्ती 10 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तो स्वतः स्वतःचे खाते व्यवहार करू शकतो.

मासिक उत्पन्न योजनेमध्ये किमान गुंतवणुक रु.1000 असुन आणि गुंतवणुकीची कमाल मर्यादा एका वैयक्तिक खात्यासाठी 4.5 लाख आणि संयुक्त खात्यांसाठी (जॉइंट होल्डिंग) 9 लाख रु. आहे.

सध्या,पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचा व्याजदर 7.1% वार्षिक आहे. योजना कालावधी 5 वर्षांचा असुन गुंतवणुकीवरचे व्याज दर महिन्याला दिले जाते. उदाहरणार्थ, श्री संजय यांनी पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत 2,00,000 रु. गुंतवले तर त्यांना 5 वर्षांसाठी दरमहा 1068 रु. व्याज मासिक उत्पन्न म्हणून मिळेल. योजना कार्यकाळ पूर्ण झाल्यावर त्यांना ठेव रक्कम परत मिळेल. मासिक प्राप्त होणारी रक्कम पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेवींमध्ये (Post office recurring deposits) देखील गुंतविली जाऊ शकते.

गुंतवणूकदार एकापेक्षा जास्त खाती ठेवू शकतात परंतु सर्व खात्यांमधील गुंतवलेली एकूण रक्कम 4.5 लाख जास्त असू नये. संयुक्त खात्यांमध्ये गुंतवणूक रकमेचे सर्व खातेधारकांचे समान भाग असतील.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना गुंतवणूकदारांना 1 वर्षानंतर ठेव काढण्याची परवानगी देखील देते. तथापि, 1 वर्ष ते 3 वर्षांच्या दरम्यान पैसे काढल्यास ठेवीवर 2% दंड आणि 3 वर्षांनंतर पैसे काढल्यास 1% दंड आकारला जातो.

देशभरातील एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये खाती हस्तांतरित करता येतात.

या योजनेत कोणताही मोठा कर लाभ नाही. दर महिन्याला मिळणारे व्याज हे करपात्र उत्पन्नाचा(Taxable Income) एक भाग आहे. व्याज पेआउटवर टीडीएस नाही. ठेवींना संपत्ती करातून (Wealth Tax) सूट आहे.

कोणतीही जोखीम नको असलेल्या आणि नियमित मासिक उत्पन्नाच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना हा एक श्रेयस्कर पर्याय आहे.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट अकाउंट/Post Office Time Deposit (POTD)-(5 year)

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट अकाउंट (POTD)- नावाप्रमाणेच, ही योजना पोस्ट ऑफिस एफडीचा(Fixed Deposit) एक प्रकार आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये एक, दोन, तीन किंवा पाच वर्षांसाठी ठेवी ठेवू शकता.

कालावधीव्याजदर (01.1.2024 पासुन लागु)
1 वर्ष 6.9%
2 वर्ष7.0%
3 वर्ष7.1%
5 वर्ष7.5%

एक, दोन आणि 3 वर्षांसाठी, FD, 6.9%, 7.0%, 7.1% व्याज देते. जर तुम्ही चांगला परतावा शोधत असाल तर तुम्ही 5 वर्षांसाठी टाईम डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवले पाहिजेत. 5 वर्षांच्या टाइम डिपॉझिट स्कीमवर, ते सर्वाधिक 7.5% पर्यंत ऑफर करते. तसेच, तुम्हाला प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत आयकर सवलतीचा लाभ मिळू शकतो.

या योजनेमध्ये गुंतवता येणारी किमान रक्कम(Min. Amt.)रु.1000 आहे. कमाल रकमेला( Maximum Amount) कोणतीही उच्च मर्यादा नाही. एखादी व्यक्ती एकापेक्षा जास्त खाती(Account ) ठेवू शकते, यावर कोणतेही बंधन नाही. स्वतःचे किंवा जॉइंट होल्डिंग प्रकारे खाती उघडता येतात.
अल्पवयीन व्यक्तीच्या नावावर गुंतवणूक करण्यासही परवानगी आहे.

संपूर्ण भारतातील एका पोस्ट ऑफिस शाखेतून दुसऱ्या शाखेत खाती हस्तांतरित (अकाऊंट ट्रान्सफर) केली जाऊ शकतात. एकदा मुदत ठेव (Fixed Deposit) परिपक्व झाल्यावर म्हणजेच त्याचा कालावधी पुर्ण झाल्यावर मुदतपूर्तीच्या दिवशीच चालु व्याजदरासह त्या रक्कमेचे पुन्हा त्याच कालावधीसाठी आपोआप नूतनीकरण ( Renew) होईल.

5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये(POTD) केलेल्या गुंतवणुकीवर कर लाभ(Tax Benefit) आहे. आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत गुंतवणूक वजावटीसाठी पात्र ठरते

पोस्ट ऑफिस -राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र/ National Saving Certificate (NSC)-

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र/ NSC चा परिपक्वता कालावधी 5 वर्षांचा आहे.NSC व्याज दर 7.7% वार्षिक असून वार्षिक चक्रवाढ व्याज दिले जाते. परंतु हे सर्व परिपक्वतेवर, म्हणजे 5 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावरच देय आहे. म्हणजे तुमची रु.100,000 ची गुंतवणूक तुम्हाला 5 वर्षांनंतर रु.1,40,300 होऊन मिळेल.


NSC मधे किमान रु.1000 ची गुंतवणुक करणे गरजेचे आहे. कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. गुंतवणुकदार 100 रु., 500 रु.,1,000 रु., 5,000 रु 10,000 रु.च्या मूल्यांमध्ये गुंतवणूक करू शकतात.

NSC मधील गुंतवणुक गुंतवणूकदार स्वतः एकटा (Single holding) किंवा,संयुक्त रित्या (Joint holding ) (फक्त 3 प्रौढांपर्यंत),अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने पालकाद्वारे किंवा 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अल्पवयीन व्यक्तीकडून त्याच्या स्वत:च्या नावाने केली जाऊ शकते.

NSC मधील गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत करसवलत आहे. NSC वरील व्याज देखील कलम 80 C अंतर्गत पुन्हा गुंतवलेले मानले जाते आणि म्हणून NSC च्या अंतिम वर्षातील व्याज वगळता इतर ४ वर्षांत मिळालेल्या व्याजावर कर वजावट मिळते.

बँक कर्ज मिळवण्यासाठी सुरक्षा (Mortgage) म्हणून NSC प्रमाणपत्रे तारण ठेवली जाऊ शकतात.

प्रमाणपत्रे हस्तांतरणीय( Transferable) आहेत. गुंतवणुकीच्या कार्यकाळात फक्त एकदाच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करण्याची परवानगी आहे.

NSC ही पारंपारिक गुंतवणूकदारांसाठी जोखीम मुक्त( Risk Free) आणि कर-बचत (Tax Saving) दीर्घकालीन बचत योजना आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना/Senior Citizens Savings Scheme

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदाराचे किमान वय 60 वर्षे आहे.
वयाच्या ५५ ​​वर्षांनंतर स्वेच्छानिवृत्ती(Voluntary Retirement) घेतलेली व्यक्ती निवृत्तीचे लाभ/रक्कम मिळाल्यानंतर एक महिन्याच्या आत या योजनेमधे गुंतवणूक करू शकते, फक्त गुंतवणूकीची रक्कम ही निवृत्तीनंतर मिळालेल्या रक्कमेपेक्षा जास्त नसावी.

प्रति व्यक्ती गुंतवणुकीची कमाल मर्यादा( Max. Limit) (सर्व खात्यांमधील एकत्रित रक्कम शिल्लक) रु. 15 लाख आहे. गुंतवणुकीची रक्कम रु. 1000 च्या पटीत असू शकते.

एखादी व्यक्ती त्याच्या नावावर किंवा त्याच्या जोडीदारासह संयुक्तपणे अनेक खाती ठेवून गुंतवणूक करु शकते.

सध्याचा व्याज दर 8.2% प्रतिवर्ष आहे, जो प्रत्येक तिमाहीच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी देय असते. ठेवीचा कालावधी 5 वर्षांचा असतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही रु.15 लाख या योजनेत आज गुंतवले ,तर तुम्हाला त्यावर 30,000 त्रैमासिक व्याज मिळणार आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते उघडण्याच्या तारखेनंतर केव्हाही मुदतीपूर्वी पैसे काढण्याची परवानगी देते परंतु त्यासाठी दंड आकारला जातो.जर खाते उघडल्यानंतर 2 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी पैसे काढल्यास ठेव रकमेच्या 1.5% तर 2 वर्षांनंतर 1% दंड आकारला जातो.

5 वर्षानंतर खाते/ ठेव आणखी तीन वर्षांसाठी वाढवता येते.
आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत ही गुंतवणूक कर कपातीसाठी पात्र आहे. तथापि, व्याजाची रक्कम एका वर्षात रु. 10,000 पेक्षा जास्त असल्यास स्त्रोतावर कर कापला जाईल.

Benefits of Investing in Post Office/ पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचे काही प्रमुख फायदे :

साधे दस्तऐवज आणि प्रक्रिया: कमी दस्तऐवजीकरण(Documentation) आणि सोपी, त्रास-मुक्त प्रक्रिया पोस्ट ऑफिस गुंतवणूक योजनांना गुंतवणूक करण्यासाठी सोपे करतात. या बचत योजना शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहेत. ज्यांचा देशभरातील पोस्ट ऑफिसमध्ये लाभ घेता येतो.

सक्षम व्याजदर आणि जोखीम-मुक्त: पोस्ट ऑफिस बचत योजना व्याजदर बँकेच्या व्याजदरांसह अत्यंत स्पर्धात्मक आहेत आणि सध्या 4% ते 8% दरम्यान आहेत. तसेच, या गुंतवणुकीत जोखीम कमी आहे कारण त्यांना सरकारचा पाठिंबा आहे.

यामुळे पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणुक करणे नक्कीच फायद्याचे आहे. दिलेली माहिती उपयोगी वाटल्यास कृपया कंमेंट करून सांगा.

जय हिंद !

Leave a Comment