Car & Electric vehicle sales in India: Feb-2024,वाहन विक्रीचा नवीन रेकॉर्ड

वाहनांच्या रिटेल विक्रीत १३% वाढ.

Car sales in India,भारतातील वाहन विक्री वाढीचा दर फेब्रुवारी २०२४ मध्येही कायम राहीला आणि वाहन विक्रीचा नवीन विक्रम नोंदवला गेला. या महिन्यामधे २० लाख ३ हजार वाहनांची विक्री झाली हि विक्री फेब्रुवारी २०२३ च्या तुलनेत १३% जास्त आहे.फेब्रुवारी २०२३ मध्ये १९ लाख ३० हजार वाहनांची विक्री झाली होती. वाहनांची वाढीव उपलब्धता,उत्तम आर्थिक वाढीमुळे वाढलेली मागणी तसेच लग्नाचा चालु हंगाम यामुळे विक्रीत हि वाढ झाल्याचे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) कडून सांगण्यात आले.

प्रवासी वाहनांची विक्रीत आघाडी कायम.

प्रवासी वाहनांनी फेब्रुवारी मध्येही विक्रीचा विक्रम कायम ठेवला असुन गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी मधील 2,93,803 वाहनांच्या विक्रीत 12% वाढ नोंदवत 3 लाख 3० हजार 107 वाहनांची विक्री केली. दुचाकी, तीनचाकी, ट्रॅक्टर आणी व्यावसायिक वाहनांसह इतर वाहनांच्या श्रेणीमध्ये अनुक्रमे 13 टक्के, 24 टक्के, 5 टक्के वाढ नोंदवली गेली.

ग्रामीण भागातील वाढलेल्या मागणी मुळे तसेच प्रीमियम मॉडेलची वाढलेली लोकप्रीयता आणि एन्ट्री लेवल श्रेणीमधील उत्कृष्ट कामगिरी मुळे विक्रीत वाढ झाल्याचे जाणकारां कडून सांगण्यात येत आहे.फेब्रुवारी महिन्यामध्ये दुचाकी वाहनांची विक्री 14.30 लाखांवर पोहचली असुन तीनचाकी वाहनांची विक्री ९४,९१८ झाली असुन तीनचाकी वाहन विक्री मध्ये मागील फेब्रुवारी 2023 च्या तुलनेत 24 टक्के वाढ दिसुन येत आहे.

इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ

या सर्व वाहनांच्या विक्रीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 53% आहे।इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीतील ही वाढ लक्षात घेण्यासारखी आहे. मागील 12 महिन्यांमधे मार्च 2023 ते फेब्रुवारी 2024 पर्यंत 16,07,012 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली.भारतातील दुचाकी वाहन प्रकारामध्ये इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची एकूण संख्येतील वाढ जानेवारी 2024 मध्ये 5.6% वरुन फेब्रुवारी 2024 मध्ये 5.7% पर्यंत पोहोचली.भारतातील चारचाकी इलेक्ट्रिक वाहन प्रकारामध्ये टाटा मोटर्स 68% वाट्यासह सर्वात पुढे असुन यानंतर MG मोटर्स व महिंद्रा आणि महिंद्रा आहेत.

इलेक्ट्रिक बस प्रकारामध्ये टाटा मोटर्स ने फेब्रुवारी 2024 मध्ये सर्वात जास्त बस विकल्या यानंतर PMI ELECTRO MOBILITY आणि OLECTRA GREENTECH चा नंबर लागतो.

Leave a Comment