सर्वसामान्य व मध्यमवर्गीय गुंतवणुकदारांमध्ये गुंतवणुकीचा सर्वात आवडता पर्याय म्हणजे पीपीएफ/PPF (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी. भारत सरकार ने १९६८ साली “पब्लिक प्रोव्हीडंट फंड स्कीम” गुंतवणुक बाजारात आणली. प्रत्येकाकडे त्याच्या निवृत्ती नंतर पुरेसे पैसे असावे हा त्यामागील उद्देश होता.
स्थिर व्याजदर, गुंतवणुकीवर दरवर्षी मिळणारी करसवलत,चक्रवाढ पद्धतीने मिळणारे व्याज आणि मुदतीनंतर मिळणारी करमुक्त रक्कम या वैशिष्ट्यांमुळॆ या योजनेमधे गुंतवणुक करण्याकडे लोकांचा सर्वाधिक कल असतो.
मात्र पीपीएफ/PPF संबंधीच्या महत्वाच्या नियमांची बहुतेक गुंतवणुकदारांना माहीती नसते. माहिती नसल्याने PPF संबंधीचे नियम डावलले गेल्यास PPF खाते अडचणीत येऊ शकते. अपवादात्मक स्थितीत हे खाते बंदही होऊ शकते. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी याबाबतची संपुर्ण माहीती घेऊन गुंतवणुक केल्यास अधिक लाभदायी ठरेल.
PPF गुंतवणुक -महत्त्वाची माहीती | |
PPF Interest Rate/ व्याज दर | 7.1% (1st Oct. 23- 31st Dec. 2023) आर्थिक वर्ष FY 2023-24) |
Minimum Investment Amount/ किमान गुंतवणुक रक्कम | Rs. 500 प्रती आर्थिक वर्ष |
Maximum Investment Amount/कमाल गुंतवणुक रक्कम | Rs. 1.5 Lakh p.a./ प्रती आर्थिक वर्ष |
Tenure/ गुंतवणुक कालावधी | 15 Years (Can be extended in blocks of 5 years thereafter) |
Tax Benefit/टॅक्स फायदे | Up to Rs.1.5 lakh, Section 80C अंतर्गत |
एक व्यक्ती “पीपीएफ” ची कीती खाती उघडू शकतो?? PPF Account Limit.
एक व्यक्ती स्वतःच्या नावे पीपीएफ/PPF चे केवळ एकच खाते उघडू शकतो. हे खाते बँक किंवा टपाल कार्यालयात उघडता येते, त्यावेळी पीपीएफ खाते सुरु करण्याच्या अर्जात, “माझे अन्य कोठेही PPF खाते नाही असे हमीपत्र द्यावे लागते. हि हमी खोटी ठरल्यास खातेदारावर कारवाई होऊ शकते.
एखाद्या खातेदाराची दोन पीपीएफ खाती असल्याचे उघड झाल्यास दुसरे खाते अवैध मानले जाते. त्यातील रकमेवर व्याज/Interest मिळत नाही. हे दुसरे खाते पहिल्या खात्यामध्ये विलीन करता येते.पण यासाठी केंद्रीय आर्यअर्थ मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागते. परवानगी मिळाल्यानंतर व्याज चालु होते.
अज्ञान मुलांच्या नावाने खाते उघडता येते का? Can parents open PPF Account on minor child’s name ?
हो पालकांना अज्ञान मुलांच्या म्हणजेच १८ वर्षा खालील मुलांच्या नावाने खाते उघडता येते.पालकांपैकी कोणाचे वैयक्तीक पीपीएफ/PPF खाते असेल तरीही मुलाच्या नावे दुसरे खाते सुरु करता येते. मात्र एका मुलाच्या नावे एकच खाते उघडता येते त्यामुळे एका मुलाच्या नावे आई किंवा वडीलांपैकी एकालाच खाते सुरु करता येते.
PPF चे संयुक्त खाते उघडता येते का?Can we open PPF Joint Account?
नाही बँकेच्या बचत खात्याप्रमाणे “पीपीएफ” चे संयुक्त खाते/Joint Account उघडता येत नाही. अनावधानाने असे संयुक्त खाते उघडले गेल्यास आणि ते लक्षात आल्यास ते खाते रद्द करण्याचा अधिकार बँक वा टपाल खात्यास असतो.जरी संयुक्त खाते उघडता नाही आले तरी सुरक्षेच्या दृष्टीने PPF खात्याला नॉमिनी/वारसदार नेमता येतो.
PPF account मधे वार्षिक गुंतवणुकीची मर्यादा किती आहे? Annual Investment amount limit in PPF account?
पीपीएफ खात्यामध्ये दरवर्षी जास्तीत जास्त १,५०,०००/ दीड लाख रुपये भरण्याची परवानगी असते. यापेक्षा जास्त पैसे भरल्यास त्यावर व्याज दिले जात नाही आणि त्यावर करसवलतही लागु होणार नाही.पीपीएफ खात्यामध्ये दरवर्षी किमान ५००/ पाचशे रुपये भरले गेले पाहिजेत तसे ना झाल्यास ते खाते बंद होऊ शकते
What is PPF interest rate 2023? PPF साठी व्याज दर किती आहे?
PPF व्याज दर: PPF साठी व्याज दर प्रत्येक तिमाहीसाठी सरकारद्वारे सेट केला जातो आणि दिला जातो. आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी म्हणजेच 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत PPF व्याज दर 7.1% वर निश्चित करण्यात आला आहे.
Loan availability on PPF investment. पीपीएफ/PPF गुंतवणुक रकमेवर कर्ज मिळु शकते का ?
हो, PPF खातेधारक त्याच्या PPF शिल्लक रकमेवर कर्ज घेऊ शकतो. तथापि, कर्ज हे ज्या आर्थिक वर्षामध्ये गुंतवणुक सुरु केली आहे त्या वर्ष समाप्ती नंतर एक वर्ष पूर्ण झाल्यावर तसेच त्या आर्थिक वर्ष समाप्ती नंतर पाच वर्षांच्या समाप्तीपर्यंत घेतले जाऊ शकते. जास्तीत जास्त कर्जाची रक्कम शिल्लक रकमेच्या 25% पर्यंत मर्यादित आहे. ज्या वर्षात कर्ज लागू होत आहे त्या वर्षाच्या आधीच्या दुसऱ्या वर्षाच्या शेवटी शिल्लक असलेल्या रकमेवर २५% कर्ज मिळू शकते.
उदाहरण घेऊन समजून घेऊ. समाजा तुम्ही १ मार्च २०२० च्या सुरुवातीला PPF खाते काढुन पहीली गुंतवणुक केली म्हणजे तुमच्या गुंतवणुकीचे पहिले आर्थिक वर्ष आहे २०१९-२० हे वर्ष ३१ मार्च २०२० ला संपेल.
आता तुम्हाला कर्जासाठी पुढचे १ आर्थिक वर्ष म्हणजे २०२०-२१ समाप्तीपर्यंत वाट पाहावी लागेल. त्यानंतर तुम्ही एप्रील २०२१ ते ३१ मार्च २०२५ म्हणजे गुंतवणुक वर्षानंतरचे पाच वर्ष समाप्तीपुर्वी पर्यंत कर्ज घेऊ शकता. वरील उदाहरण समजण्यासाठी आपण खाली दिलेला Table-१ पाहु.
वर्ष क्र./Year No. | FY-आर्थिक वर्ष | आर्थिक वर्षाच्या शेवटी शिल्लक रक्कम | Loan/कर्ज |
गुंतवणुक वर्ष/Investment Year | 2019-20 | 1,10,000 | |
वर्ष-1 | 2020-21 | 2,40,000 | |
वर्ष-2 | 2021-22 | 3,00,000 | कर्ज उपलब्ध |
वर्ष-3 | 2022-23 | 4,10,000 | कर्ज उपलब्ध |
वर्ष-4 | 2023-24 | 5,00,000 | कर्ज उपलब्ध |
वर्ष-5 | 2024-25 | 5,90,000 | या वर्षाच्या समाप्तीपर्यंत कर्ज उपलब्ध |
ज्या वर्षात कर्ज उपलब्ध होत आहे म्हणजे वर्ष-3-आर्थिक वर्ष 2022-23, त्या वर्षाच्या आधीच्या दुसऱ्या वर्षाच्या शेवटी शिल्लक असलेल्या रकमेवर 25% कर्ज मिळू शकते. आपण वरील Table-1 मधे पाहु शकतो जर तुम्ही तिसऱ्या आर्थिक वर्षात म्हणजे F.Y.2022-23 मधे कर्ज घ्यायचे ठरवल्यास कर्ज रक्कम ही 2,40,000 च्या 25% म्हणजे 60,000 असेल
जर तुम्ही चौथ्या वर्षात कर्ज घेत असाल तर तुम्हाला वर्ष-२ म्हणजे आर्थिक वर्ष 2021-22 च्या शेवटी शिल्लक रक्कम 300,000 च्या 25% म्हणजे रु.75,000/- कर्ज मिळु शकेल.
PPF चे खाते कुठे उघडावे ? How to open PPF account ?
कोणतीही व्यक्ती जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा राष्ट्रीयीकृत बँका आणि ICICI, Axis, HDFC इत्यादी सारख्या प्रमुख खाजगी बँकांद्वारे PPF खाते उघडू शकते.
हे लक्षात घ्या की बँका फक्त मध्यस्थ आहेत जे तुम्हाला PPF खाते उघडण्यास मदत करतात, तुम्ही जमा केलेले पैसे हे सरकारकडे जातात, खाते उघडलेल्या बँकेकडे नाही.
Documents required to open a PPF account. पीपीएफ खाते उघडताना आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी.:-
- PPF खाते उघडण्याचा फॉर्म (हा फॉर्म PPF खाते उघडण्यासाठी अधिकृत असलेल्या कोणत्याही बँकेतून देखील मिळवता येतो)
- व्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी KYC कागदपत्रे- आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (Aadhaar Card, Voter ID card, or Driving License)
- पत्त्याचा पुरावा/Proof of Address
- पॅन कार्ड/PAN Card
- व्यक्तीचा पासपोर्ट आकाराचा फोटो/Passport-size photograph of the individual
- नामनिर्देशन फॉर्म/Nomination form- फॉर्म ई /FORM-E (हा फॉर्म पीपीएफ खाते उघडण्यासाठी अधिकृत असलेल्या कोणत्याही बँकेतून मिळू शकतो)
सारांश:-
सारांश:- तुमची स्वतःची आर्थिक ध्येय काय आहेत, जर तुमची जास्त कालावधीची ध्येय असतील त्यामध्ये तुम्ही तुमची गुंतवणुक पुढील १५ वर्षासाठी गुंतवुन ठेवण्यास तयार असाल तर PPF मधील गुंतवणुक तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.